रुग्णाची माहिती प्रसिद्ध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

खंडाळा (प्रतिनिधी)- खंडाळा तालुक्यातील कोविड१९ शी संबंधित विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ३० अनुमानित रुग्णानची यादी व्हॉटसपअ सोशल मिडीयातन प्रसिद्ध केल्यामुळे खंडाळा पोलीस ठाण्यात त्या ग्रुपच्या अॅडमिनसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार करीत आहेत.