राज्यातल्या एस.टी. स्टॅन्ड आवारातील व्यवसायीकांचे बंद काळातले भाडे माफ करा सादिक खाटीक यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी .

आटपाडी दि .४ ( प्रतिनिधी ) 
राज्यातल्या मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानक आवारात असणाऱ्या सर्वच व्यवसायीकांचे लॉक डाऊन कालावधीतले जागा भाडे शासनाने माफ करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे .
       मुख्यमंत्री ना. श्री . उध्दवजी ठाकरे साहेब , उपमुख्यमंत्री ना. श्री.अजितदादा पवार साहेब, परिवहन मंत्री ना.श्री. अनिल परब साहेब , जलसंपदामंत्री ना. श्री. जयंतराव पाटील साहेब , परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील साहेब यांना वॉटस् अप , ईमेलच्या माध्यमातून पाठविलेल्या निवेदनाद्वारे त्यांचे लक्ष वेधल्याचे सादिक खाटीक यांनी सांगितले .
        कोरोणा महामारीच्या संकटामुळे संपूर्ण राज्यातील  व्यवसाय , धंदे , वाहतूक ठप्प आहे . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यातील शेकडो  एस.टी. बसस्थानक परिसरात छोटे छोटे व्यवसायाची राज्यात हजारो  दुकाने आहेत . रसवंतीगृहे , ज्यूस सेटर, दुग्धजन्य पदार्थाची दुकाने, फळांचे स्टॉल ,केशकर्तनालय, मेवा मिठाई स्टॉल ,चप्पल दुकाने, बुक स्टॉल, पेपर स्टॉल, चहाचे स्टॉल ,कॅन्टीन इत्यादी व्यवसायाच्या या दुकानांसाठी महामंडळ प्रति महिना त्या त्या जागेच्या प्रमाणात भाडे आकारत असते . तथापि लॉक डाऊन मुळे, महिन्याहुन अधिक काळ होत आला तरी या बसस्थानक परिसरातले जवळजवळ सर्वच व्यवसाय बंद आहेत .व्यवसाय ठप्प झाल्याने या व्यवसायीकांचे दैनंदीन जगणे जिगरीचे बनले आहे . बहुतांश व्यवसायीकांचा , हा व्यवसायच उत्पन्नाचे मुख्य साधन  असल्याने या सर्वांचे या बंद मुळे आर्थीक नियोजन कोलमडले आहे . लॉकडाऊन आणखी किती दिवस चालेल याची खात्री नसल्याने या व्यवसायीकांची भविष्यात मोठी आर्थीक कुचंबना होणार आहे . लॉकडाऊनमध्ये काही ठिकाणी काही अंशी व्यवसाय सूरु करण्याबाबत शासनाने शिथिलता दिली असली तरी जोपर्यत राज्यभरात एस.टी. च्या माध्यमातून प्रवाशी वाहतूक सुरू होत नाही तोपर्यत बसस्थानकातील या व्यवसायीकांना ग्राहक तरी मिळणार कोठून ? आणि हे व्यवसाय चालणार तरी कसे ? अशी या व्यवसायीकांना काळजी लागली आहे .सदयस्थितीत  दैनंदीन गरजा कशा भागवायच्या , प्रपंच कसा चालवायचा , याने त्यांचे डोके भंडावून जाणार आहे . हातावरची पोटे असणाऱ्यांचीच बसस्थानक परिसरात मोठया संख्येने दुकाने आहेत . या सर्वांची एकूण आर्थीक परिस्थिती , लॉक डाऊन ने बिघडलेले अर्थकारण , बंद असलेले व्यवसाय, धंदे लक्षात घेऊन  बसस्थानक परिसरात छोटे छोटे व्यवसाय धंदे करणारांचे , लॉक डाऊन कालावधीत जागा -दुकान भाडे माफ करून या सर्वांना मोठा दिलासा दयावा . अशी राज्यातल्या सर्व व्यावसायीकांची अपेक्षा आहे . या भाडे माफीचा फायदा राज्यातल्पा सर्व बस स्थानकातील सर्वच व्यावसायिकांना व्हावा यासाठी आपल्या सरकारने सत्वर निर्णय करावा. अशी अपेक्षा सादिक खाटीक यांनी व्यक्त केली आहे .