केंद्र सरकार दारू विक्री सुरू करणार असेलतर गांजा लागवडीसाठी शेतक-यांना परवानगी घ्यावी÷बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष सुरेखाताई जाधव

जगभरामध्ये कोरोना संसर्गाने थैमान घातले असून कोरोना रोखण्यासाठी देशासह आपल्या संपूर्ण राज्यामध्ये लाॅकडाऊन आणि संचारबंदी आहे.सध्या परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे. त्यामध्ये केंद्र सरकार दारू विक्री सुरू करणार म्हणताय जर का केंद्र व राज्य सरकाराला दारू दुकान विक्री सुरू करून देशातील व महाराष्ट्र राज्य लोकांची घर बरबाद करणार असेलतर शेतक-यांना पण गांजा लागवडी करण्याची परवानगी द्यायला हरकत नसावी.असे परखड मत बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडीच्या सुरेखाताई जावध यांनी व्यक्त केले आहे.त्यामध्ये विरोधी पक्षाने जनतेला सहकार्य करायचे सोडून ते तर वेगळेच राजकारण करत बसले आहेत. लाॅकडाऊनचा सामान्य जनतेला सगळ्यात जास्त फायदा झाला असेल तर भारतदेश व्यसन मुक्त झाला आहे. ऐतिहासिक दारूबंदी देशात राबवली गेली आणि मोदी सरकार या व्यसन मुक्तीला हरताळ फासणार असेलतर यापेक्षा मोठा जनताद्रोह तो कोणता?गरीब जनतेच्या अकाउंडमध्ये टाकलेले पैसे दारूच्या माध्यमातून लुटण्याचा आणि सर्व सामान्य गरीब जनतेला लुबाडण्याचा मोदी सरकार व राज्य सरकाराचा जर डाव असेलतर बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडी अशा कटकारस्थानांचा तीव्र विरोध करेल.यासाठी सरकारकडे वेळोवेळी  आपल्याकडे निवदेनाद्वारे प्रामुख्याने हा प्रश्न मांडले आहेत.स्वतःला प्रधानमंत्री सेवक म्हणवणारे जर समस्त महिला वर्गाच्या  कौटूंबिक खर्चाला कात्री लावत असतील तर हे रक्षक नव्हे भक्षक आहेत हे जनतेने ओळखावे उद्या लोक दारू पिऊन बलात्कार करतील गुन्हे करतील महिलांना दारू पिऊन मारझोड करतील याची जबाबदारी देशाचे प्रधानमंत्री सेवक नरेंद्र मोदी घेतील का?एकीकडे बेटी बचाओ म्हणत बेटाच्या संसाराला नख लावणार असालतर अशा फसव्या नेत्यांना जनतेने घरचा रस्ता दाखवावा महाराष्ट्रात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यसन मुक्त महाराष्ट्रासाठी कठोर पणे दारूबंदी राबवावी.गरीबांना देशोधडीला लावणा-या केंद्राच्या दारू विक्री निर्णयाला केवळ विरोध करून थांबणार नाही.तर त्या निर्णयाविरोधात  
बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडीच्या वतीने जनआंदोलन छेडले जाईल.म्हणून केंद्र सरकार दारू विक्री सुरू करणार असेलतर गांजा लागवडीसाठी शेतकरा-यांना परवानगी देवून टाकावी असे आव्हान बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष सुरेखाताई जावध यांनी केले आहे..